Saturday, May 07, 2005

मराठीत लिहीण्याचा एक प्रयत्न! (an attempt to write in marathi)

Unicode fonts वापरून देवनागरी लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी! मायबोलीवरील हितगुजचा गेले चार वर्ष सदस्य राहिल्यामुळे मराठीतून लिहीण्याचे नियम नीटपणे माहित आहेत मला. (तसे itrans वापरून देवनागरीत लिहीता येत असेल तरी पुरेसे आहे. जवळजवळ सर्व नियम सारखेच आहेत.) परंतु मराठीतून लिहीण्याची इतकी सवय कधीच झाली नाही की पटापट मराठीतून लिहीता येईल. काही महीन्यांपूर्वी एक प्रयत्न केला होता, पण तो Unicode वापरून नव्हता आणी त्यामुळे ते post सर्व browsers वर नीट दिसायचे नाही. माझी अशी समजूत आहे की unicode मध्ये लिहीलेले मात्र सर्वत्र वाचता येईल. तुम्हाला वाचायला न जमल्यास मला नक्की कळवा.

मराठीतून blog वर कसे post करावे यावर एक छोटीशी टिप्पणी
तसे बरेच जण blogging साठी देवनागरी वापरत आहेत. त्यामुळे ह्यात नवीन किंवा विशेष काहीच नाही. काही जणांकडून सूचना मिळाल्या होत्या. पण पार पाडणे कधीच नीट जमले नाही. कदाचित माझ्याच हातून काहीतरी चुकत असेल. ह्यावेळी मात्र जमले असं वाटतं आहे. ह्यावेळी सल्ला देणारा रोहित नातू. त्याने मला ह्या साईटकडे वळवले : साईटचे नाव आहे baraha. ह्या शब्दाचा कन्नड भाषेत लिखाण असा अर्थ आहे. त्या साईटवरून baraha 6.0 download करा आणी install करा. त्यासोबत येणारी Baraha Direct Utility चा वापर करून एकदम सरळपणे देवनागरीत लिहीता येते. इककेच नाही तर मलयाळम, तेलगू, कन्नड व तामिळ भाषांमध्येही लिहिता येते. Baraha Direct चालू करा, Output format साठी Unicode निवडा आणी हवी ती भाषा निवडून सुरू व्हा. परस्पर microsoft internet explorer किंवा firefox किंवा notepad मध्ये सुद्धा लिहिले की देवनागरीत दिसते. बघा एकदा वापरून, आवडतयं का!
मराठीत लिहायचे नियम हवे असल्यास इकडे टिचकी मारा.

English synopsis of above post for those not familiar with marathi:

Check out Baraha. It seems the word 'baraha' literally means writing in Kannada. Download the Baraha 6.0 utility and install it. Using the Baraha Direct Utility that comes with it, you can directly write in Malayalam, Devanagari, Tamil, Telugu and Kannada. This will directly output Unicode text for the selected language. You can even directly type in devanagari (or any of the above languages) in blogger, MS Word, notepad, or even MSN messenger (it does not work with Yahoo messenger, no clue why). F11 will allow you to toggle between typing in English and marathi. For some reason, mozilla (firefox/netscape) does not display the devanagari fonts nicely. IE renders them much better. Ofcourse it is assumed that you have a unicode font installed. For devanagari unicode details, check here

If you are familiar with Itrans, then typing in local Indian languages should be pretty easy - it is phonetically almost exact. Baraha's help has a good overview of the transliteration keyboard mapping. Here is a link to the devanagari rules.

2 comments:

RamV said...

cool. thanks for the info. now im all set for some hindi and tamil typing :)

tweedledeetweedledum said...
This comment has been removed by a blog administrator.